Share

Alert: पुण्यातील खडकवासला धरणातून विसर्ग सुरु!

Published On: 

पुणे : जून, जुलैमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने पुणे शहराला पिण्यासह जिल्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात घट होत होती. मात्र, या आठवड्यात पावसाने शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यामुळे आता पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची वाढती संख्या हि पुण्यासाठी काळजीची बाब असली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने अंशतः दिलासा मिळाला आहे.

गेले काही दिवस धरणक्षेत्रात पावसाने सातत्याने हजेरी लावली असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर, धरणाचा पाणी साठा ९६ टक्क्यांच्या वर गेल्याने या मौसमातील पहिला विसर्ग आता सुरु करण्यात आला आहे. याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सद्या विसर्ग हा कमी असला तरी महापालिकेने आपत्ती उद्भवल्यास प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

‘उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमच्या मुलाने राजीनामा द्यावा’

“खडकवासला धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला असून विसर्गाचा वेग ४२८ क्युसेक इतका आहे. विसर्ग जास्त नसला तरी आपण पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवलेली आहे.” अशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे. तर, पावसाने आज पुन्हा शहरासह जिल्ह्यात चांगली हजेरी लावली असून गरज पडल्यास येत्या काळात विसर्गात वाढ करण्यात येऊ शकते. त्यासंदर्भात नागरिकांना आधी सतर्कता देखील दिली जाईल. तर, खडकवासला धरण साखळीतील पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरणातील पाणीसाठ्यात देखील चांगली वाढ होत आहे.

भाजपा खासदार-आमदारामध्येच एकमत नाही; पडळकरांनी केली संजय पाटलांवरच टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!