🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारताचा स्टार पैलवान बजरंग पुनिया याने बल्गेरियात सुरू असलेल्या डान कोलोव – निकोला पेत्राव कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. हे पदक त्याने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना समर्पित केले आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पुनियाने हंगामाचा दिमाखदार प्रारंभ करताना ६५ किलो वजनी गटात अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा १२-३ असा पराभव केला. या स्पर्धेद्वारे त्याने क्रमवारीतील गुणांचीसुद्धा कमाई केली आहे.
बजरंगने ट्विट करत याविषयीची माहिती दिली.’मी हे सुवर्णपदक विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना समर्पित करतो. त्यांच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली. एक दिवस त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे’, असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं.
मैं अपना गोल्ड मेडल हमारे बहादुर वायु योद्धा #WingCommandorAbhinandan को समर्पित करना चाहता हूं। उन्होंने मुझे बहुत प्रेरणा दी और मुझमें जोश भर दिया। मैं किसी दिन उनसे मिलकर उनसे हाथ मिलाना चाहता हूं।
???????? जय हिन्द जय भारत ???????????? pic.twitter.com/Ww54FKt1VU— Bajrang Punia ???????? (@BajrangPunia) March 2, 2019
दरम्यान,या स्पर्धेत पूजा ढांडा हिनेही सुवर्णपदक जिंकले. तर, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. संदीप तोमरही चांदीचा मानकरी ठरला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
