Share

पडळकरांच्या टीकेनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Published On: 

सातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्यकारभार आजही मार्गदर्शक- मुख्यमंत्री

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे असं पडळकर म्हणाले आहेत.

पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा – आरोग्य मंत्री राजेश टोपे

यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. “या प्रकरणी देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी भूमिका मांडली आहे. हे योग्य नाही. मुद्देसूद टीका करावी. व्यक्तिगत पातळीवर टीका नको.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड होत आहे. याला अजित पवारही उपस्थित आहेत. यावेळी माध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!