मुंबई : ‘अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपाचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण करोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते. हा राज्याला पडलेला प्रश्न आहे,’ अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. तर राज्य सरकार सगळंं ठीक आहे,असे आभासी चित्र उभं करत आहे. अजून शेतकरी वर्गासाठी कोणतीही घोषणा नाही. तर व्यवसायिकांना अद्याप कोणताच दिलासा दिला नाही. त्यामुळे या सरकारला जाग येण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाओ आंदोलन पुकारले आहे.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र करोनाविरुद्धची एकजुटीनं लढाई लढत असताना, अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल’.
दरम्यान, राज्यातील डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस, प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन करोनाविरुद्ध लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे,’ असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

