🕒 1 min read
नागपूर:- ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी या मागणीसाठी गेल्या महिन्यात जालन्यात ओबीसी महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा असेल, असे वक्तव्य करणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे. भाषणात बोलण्याच्या नादात अशा प्रतिक्रिया दिल्या जातात. पण ज्या पक्षाकडे बहुमत असते त्यांचाच प्रमुख असतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहेत.
अजित पवार सोमवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना विजय वडेट्टीवार यांनी जालन्यातील ओबीसी महामोर्चावेळी केलेल्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आपण ज्या समाजातून पुढे येतो त्यांच्या मेळाव्यात अशा उत्स्फुर्त प्रतिक्रिया येतात. मेळाव्यात टाळ्या वाढत असताना एखाद जादा वाक्य बोललं जातं. मात्र, जास्त संख्याबळ असणाऱ्या पक्षाचा नेता हाच प्रमुख असतो. तरीही विजय वडेट्टीवार यांच्या विचाराला आमच्या शुभेच्छा आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून या भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वतःला रंगवून घेतले’
- ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत, तेथे देवादिकांचे काय घेऊन बसलात !’
- माझ्यावर केलेली कारवाई राजकीय दबावापोटी: नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर
- सचिन,लतादीदी,कोहली यासारख्या दिग्गज सेलिब्रिटींवर खरंच कुणी दबाव टाकू शकेल ?
- वनक्षेत्राला लागलेल्या आगीत 2 हेक्टरवरील झाडे जळून खाक


