Share

‘लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलेल्या ‘स्वराज्या’चे आपण सर्वांनी मिळून ‘सुराज्या’त रुपांतर करुया’

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात ,’ स्वातंत्र्य संग्रामाला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असा हुंकार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिला. आपल्या विद्वत्तेने आणि प्रखर पत्रकारितेने लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे दिले. त्यासाठी अनेकदा तुरुंगवास भोगला. त्यांच्या त्याग,समर्पण आणि लढवय्येपणामुळे आपण आज समृद्ध, बलशाली राष्ट्राचे स्वप्न पाहू शकतो. लोकमान्य टिळक यांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन!

अखेर सांगलीतील ४०० वर्ष जुन्या वटवृक्ष वाचले! आदित्य ठाकरेंनी मानले गडकरींचे आभार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्य टिळकांनी मिळवून दिलेल्या ‘स्वराज्या’चे आपण सर्वांनी मिळून ‘सुराज्या’त रुपांतर करुया असे, आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा उपस्थित होत्या.

‘शिवरायांच्या आशीर्वादाचे नाव घेत सत्तेवर आलेली भाजपा औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!