🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते.
25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोरोनासह न्युमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून ते तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
आम्हाला दुय्यम स्थान किंवा छोटा भाऊ म्हणणं याची खदखद – पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, दत्ता साने यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी हर्षदा, 19 वर्षीय मुलगा आणि 16 वर्षीय मुलगी तर दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. दत्ता यांच्या अशा जाण्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दत्ता साने हे ‘दत्ताकाका’ नावाने अख्खा चिखलीमध्ये प्रसिद्ध होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते.
तर दत्ता साने यांच्या निधनाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनानं सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीनं काम करणारा झुंजार कार्यकर्ता,चांगला सहकारी आपण गमावला आहे.त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान कायम स्मरणात राहील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली’! अस अजित पवार म्हणाले आहेत.
ते शरद पवार आहेत काहीही घडवू शकतात, राणेंच्या विधानाने चर्चांना उधान
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि @NCPspeaks चे नगरसेवक दत्ता साने यांच्या निधनानं सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीनं काम करणारा झुंजार कार्यकर्ता,चांगला सहकारी आपण गमावला आहे.त्यांचं सामाजिक कार्यातील योगदान कायम स्मरणात राहील.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/JRIYoS5pBU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
