Share

VIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश महाजनांचा समाचार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीच्या परिवर्तन सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समाचार घेतला आहे.

मध्यंतरी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मला पक्षाने जबाबदारी दिली तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवू’, असे विधान एका जाहीर कार्यक्रमात केले होते. त्यावर बारामती काय आहे ते माहिती आहे का ? बारामतीत या तुम्हाला दाखवतोच, अशा शब्दात अजित पवार यांनी गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

त्याबाबत अजून बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना आणि मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपं आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या”, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!