Share

IPL 2020 : अजिक्य राहणेने राजस्थानची साथ सोडली,आता ‘या’ संघाकडून खेळणार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आयपीएलच्या तेराव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हंगाम सुरू होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना डिसेंबरमध्ये IPL 2020साठी लिलाव होणार आहे.

दरम्यान त्याआधी आयपीएलच्या लिलावासाठी ऑफ सीझन ट्रेड विंडो ही 14 नोव्हेंबरपर्यंत खुली राहणार आहे. त्यामुळं कोणत्या खेळाडूंना ठेवणार किंवा रिलीज करता येणार यासाठी एका दिवसाचा कालावधी उरला आहे.

दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्सचा प्रमुख खेळाडू अजिंक्य रहाणेने अखेरीस आपल्या संघाची साथ सोडली आहे. आगामी हंगामाकरता अजिंक्य दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या महत्वाच्या बातमीची घोषणा केली आहे.

तर दुसरीकडे यावर्षीचे देखील अजिंक्यपद पटकाविण्यासाठी मुंबई इंडियन्सने कंबर कसली आहे. IPL मधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स यांनी बुधवारी एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे.

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला IPL 2020 साठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. पण या हंगामात दिल्लीने बोल्टला मुंबई इंडियन्सशी ट्रेड केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!