नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. त्यांच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी संयम बाळगावा, असे म्हटले आहे. दोघांच्याही कठीण काळात संयम बाळगणे आवश्यक असल्याचे विक्रम राठोड यांनी म्हंटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी विक्रम राठौर (Vikram Rathour) यांनी ही प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत विक्रम राठोड म्हणाले की, “पुजारा आणि रहाणेचा प्रश्न आहे, ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांचे सर्वोत्तम देत आहेत. रहाणे खरोखरच सुस्थितीत होता पण दुर्दैवाने तो आऊट झाला आणि पुजाराच्या बाबतीतही असेच घडले.”
ते पुढे म्हणाले की, “पुजाराने यापूर्वीही आमच्यासाठी काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत, तुम्ही पाहा की या आव्हानात्मक परिस्थिती आहेत आणि येथे फार लोकांनी धावा केल्या नाहीत. जोपर्यंत ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत आपण संयम बाळगला पाहिजे.
Stumps on Day 4 of the 1st Test.
South Africa end the day on 94/4. #TeamIndia 6 wickets away from victory.
Scorecard – https://t.co/eoM8MqSQgO #SAvIND pic.twitter.com/IgRuammbPo
— BCCI (@BCCI) December 29, 2021
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 48 धावा केल्या होत्या. पुजारा दोन्ही डावात फ्लॉप ठरला. तर रहाणे एका डावात फ्लॉप झाला. टीम इंडियाने चौथ्या दिवशीच्या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या. अशा स्थितीत आता त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे. भारताला अजून 6 विकेट घ्यायच्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत याचं पोलिसांनी भान ठेवायला हवं- प्रविण दरेकर
- “…तर महाराष्ट्रालाही कठोर निर्णय घ्यावेच लागतील”,शिवसेनेचा इशारा
- महात्मा गांधींबद्दल ‘ते’ वक्तव्य आले अंगलट; कालीचरण महाराजांना अटक
- नसिरुद्दीन शाह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांचे टीकास्त्र; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

