Share

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या फॉर्मवर फलंदाजी प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया

Published On: 

नवी दिल्ली : अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. त्यांच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी संयम बाळगावा, असे म्हटले आहे. दोघांच्याही कठीण काळात संयम बाळगणे आवश्यक असल्याचे विक्रम राठोड यांनी म्हंटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी विक्रम राठौर (Vikram Rathour)  यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पत्रकार परिषदेत विक्रम राठोड म्हणाले की, “पुजारा आणि रहाणेचा प्रश्न आहे, ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत, ते त्यांचे सर्वोत्तम देत आहेत. रहाणे खरोखरच सुस्थितीत होता पण दुर्दैवाने तो आऊट झाला आणि पुजाराच्या बाबतीतही असेच घडले.”

ते पुढे म्हणाले की, “पुजाराने यापूर्वीही आमच्यासाठी काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या आहेत, तुम्ही पाहा की या आव्हानात्मक परिस्थिती आहेत आणि येथे फार लोकांनी धावा केल्या नाहीत. जोपर्यंत ते त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत आपण संयम बाळगला पाहिजे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 48 धावा केल्या होत्या. पुजारा दोन्ही डावात फ्लॉप ठरला. तर रहाणे एका डावात फ्लॉप झाला. टीम इंडियाने चौथ्या दिवशीच्या सामन्यात आपली पकड मजबूत केली आहे. 305 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 94 धावा केल्या. अशा स्थितीत आता त्यांना विजयासाठी 211 धावांची गरज आहे. भारताला अजून 6 विकेट घ्यायच्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!