Share

किटकनाशकांची फवारणी करण्यासंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शक सूचना जाहीर

Published On: 

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत अशा किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना आज जाहीर करण्यात आल्या आहेत. विषबाधा झालेल्या व्यक्तीबाबत शासकीय यंत्रणेला तत्पर माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी केले आहे.

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी किटकनाशकांची अथवा कीडनाशकांची फवारणी करताना आवश्यक ती खबरदारी संबंधितांनी घेणे आवश्यक आहे, संरक्षक किटचा वापर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे. खबरदारी घेऊनही विषबाधा झाल्यास बाधीत व्यक्तीवर तातडीने प्रथमोपचार करुन त्यासंदर्भात शासकीय यंत्रणेला तत्पर कळविणे आवश्यक आहे.

कृषी विभागामार्फत खालील मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

• किटकनाशकांची फवारणी करताना सर्व शेतकरी (भूधारक/ शेतमालक) व शेतमजूर यांनी हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी इत्यादीचा वापर करावा.

• किटकनाशकांची फवारणी शेतमजूरांमार्फत केली जात असताना शेतमजूरांना संरक्षक किट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची जबाबदारी शे‍तमालकाची आहे.

• किटकनाशकांची फवारणी करतेवेळी प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे.

• पिकावर किटकनाशकांची फवारणी शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिणण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.

• फवारणी करताना वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन फवारणी करावी. वारे वाहण्याच्या विरुध्द दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास किटकनाशकाचा फवारा मोठ्या प्रमाणात शरीरावर पडून शरीरात विष भिणण्याची शक्यता असते.

• फवारणी करताना जवळपास अन्य असंबधीत व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.

• ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरिन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस + सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी. ) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीच्यावेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

• फवारणी करताना कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच किटकनाशकांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे.

• शेतमालकाने माणुसकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषी सहाय्यकाला अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला अथवा तहसिलदार यांना अथवा पोलिस ठाणे अंमलदारास अथवा आरोग्य अधिकाऱ्याला अथवा जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याला अथवा जिल्हा शल्यचिकित्सकाला अथवा जिल्हाधिकारी यांना तत्काळ माहिती कळवावी. त्याचप्रमाणे, बाधित व्यक्तीच्या कुटुंबियांनासुध्दा शेतमालकाने अवगत करावे.

• शेतमालकाने अथवा शेतमजुरांनी विषारी किटकनाशके लहान मुले अथवा जनावरे यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच, किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर, शिल्लक राहिलेले किटकनाशक, किटकनाशकाचे डबे, पॅकिंग,बॉक्स, इत्यादी साहित्य काळजीपूर्वक नष्ट करावे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

• किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमालकाने अथवा शेतमजूरांनी फवारणी दरम्यान अथवा फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये.

• शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजूराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातून किमान एकदा शारीरिक तपासणी करुन घ्यावी.

या मार्गदर्शक सूचनांचे पालन शेतकरी व शेतमजूर यांनी करणे आवश्यक आहे, जेणेकरुन संभाव्य जिवितहानी टाळता येऊ शकेल, असे कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!