Share

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर,शेती संबंधित दुकाने पूर्णवेळ खुली राहणार

Published On: 

नाशिक : खरीप हंगामासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक असल्यामुळे शेती आणि शेतीसंबंधित यंत्रसागुग्री, बि-बियाणे आदी दुकानांसाठी मार्गदर्शन सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे, शेती विषयक विक्री आणि दुरुस्तीचे दुकाने, केंद्रे, यंत्रसामुग्री दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शासकीय आदेशान्वये दिली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाने ‘खरीप 2020’ साठी शेतमाल उत्पादन, वाहतूक, वितरण तसेच शेतीसाठी आवश्यक सामुग्री, खते, बि-बियाणे, यंत्रसामुग्री आणि कृषी विषयक इतर बाबी यांच्या सुलभ उपलब्धतेसाठी काही सूचना केल्या आहेत. तसेच
शेतीअवजारे, बि बियाणे, यंत्रसामुग्री यांची दुकाने जरी पूर्णवेळ उघडी राहणार असली तरी अपवादात्मक परिस्थितीत गरज भासल्यास वेळेबाबतीत बंधन घालण्यात येतील.

खरीप हंगामासाठी मर्यादित वेळ शिल्लक असल्यामुळे खरीप हंगाम पूर्व कामे, मजुरांची वाहतूक, बि- बियाणे, खते आणि यंत्रसामुग्री यांची वाहतूक आणि पुरवठा सुरळित होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत.

कृषी विभागाचा पास गृहीत धरावा शेतीच्या कामासाठी मजूर, शेतीपूरक पुरवठा उद्योगासाठी कामगार, कृषी संबंधी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याद्वारे नियुक्त प्राधिकारी यांनी वितरीत करण्यात आलेला परवाना पास पोलिस विभागाने ग्राह्य धरावा, असेही मांढरे यांनी सांगितले.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!