दिल्ली: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली असून पंजाब वगळता इतर सर्वच राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. आज दुपारपर्यंत निकालांचा कल स्पष्ट होईल. या निवडणुकांची घोषणा झाल्यापासूनच पूर्ण देशाचे लक्ष हे उत्तर प्रदेशवर लागलेले होते. एग्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असे सांगण्यात येत होते. आज सकाळपासून मतमोजणीतही भाजपला जवळपास २६८ जागांवर आघाडी मिळालेली आहे. गोव्यातही भाजप सत्ता राखण्यात यशस्वी होताना दिसते आहे. त्यामुळे या विजयचा आनंद आणि जल्लोष साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी सुरु झाली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठी घट होईल, मात्र ४०३ सदस्यांच्या विधानसभेत जवळपास २४० जागांसह हा पक्ष बहुमत मिळवेल, तसेच समाजवादी पक्षाने सत्ताधारी भाजपला जोरदार लढत दिली असून, हा सपा जवळपास १५० जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या:

