Share

काळा पैसा कुठे गेला, रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसचा सरकारला सवाल

Published On: 

नवी दिल्ली : ज्या काळ्या पैशाला हद्दपार करण्यासाठी नोटारद्दचा निर्णय घेण्यात आला. तो काळा पैसा कुठे गेला, असा सवाल कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ लाख कोटी काळा पैसा बाहेर आल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांची आकडेवारी चुकीची असून त्यांनी आपली चुक स्विकारून माफी मागायला हवी, असे कॉंग्रेस नेते आनंद शर्मा  यांनी म्हटले.

नोटारद्दच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेने जारी केलेल्या आकडेवारीनंतर कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे. देशात ९६ टक्के रोखविरहीत व्यवहार केला जातो. सरकारने दावा केला होता की, १५ लाख २८ हजार नोटा परत आल्या. रिझर्व्ह बॅकेने म्हटले होते की, केवळ ४१ कोटी बनावट नोटा आहेत. इतक्यासाठी भारतात आर्थिक अराजकता पसरवण्यात आली. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दरही या निर्णयामुळे घसरला. हा पंतप्रधानांचा वैयक्तिक निर्णय होता, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!