Share

मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा :गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

आज महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याच आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आल आहे, तसेच परिवहन सेवा ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणता ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.

मराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच

काँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!