Share

‘आरे’ वृक्षतोडी प्रकरणानंतर आता पालघरमध्ये वृक्षतोड

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘आरे’ वृक्षतोडी प्रकरणानंतर आता मुंबईत पुन्हा एकदा वृक्ष तोड होणार असल्याच दिसत आहे. एमएमआरडीएच्या मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल 131.57 एकर जंगलांची तोड होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मेट्रो-3 च्या कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली होती. यावरून मुंबईकरांनी प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केला होता. तर ही वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालायचे दार ठोठावले. मात्र आता पर्यावरण प्रेमींना पुन्हा एकदा प्रशासना विरुद्ध लढा द्यावा लागणार आहे.

एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्चून पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. त्याद्वारे वसई-विरार महापालिकेसह परिसरातील 27 गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल 131.57 एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खारफुटीचाही समावेश आहे. सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू असून पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू आहे. यासाठी 80 एकर राखीव, तर 42 एकर संरक्षीत वनांचा बळी जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1192067133804441601?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192065561867374593?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192052286815518720?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!