Share

अन् टीकेची झोड सुरू होताच राष्ट्रवादीचे आ. राजू नवघरे ढसाढसा रडले

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा १४ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झाले. त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेट घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे.

हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या प्रकरणावरुन टीकेची झोड उठल्यानंतर आमदार राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी जाहीर माफी मागत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी ते ढसाढसा रडले.

माध्यमांशी बोलताना आ.नवघरे म्हणाले की, ‘सर्वच पक्षाच्या लोकांनी मला तिथे जायला सांगितलं. मी म्हटलं राजकीय माणसाला वर पाठवू नका. पण मला त्यांनी अखेर वर चढवलं. पुतळ्याची उंची १६ फूटांची आहे. मी तिथे पुष्पगुच्छ वाहिले आणि खाली आलो. तिथे सगळेच होते. पण माझ्या एकट्याचाच पाय तिथे लावल्याचं दाखवलं जातंय. जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी मी माफी मागतो. माझी यात कुठे चूक नाही असं मी मानतो. माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, तर त्याच्याविरोधात सगळे पेटून उठायचं काम करत आहेत”, असं म्हणत आमदार राजू नवघरेंनी फक्त आपल्यालाच लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप केला.

पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझी चूक झाली असेल तर मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही”, असे बोलताना आमदार राजू नवघरेंना रडू कोसळले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!