Share

भारत वि. ऑस्ट्रेलिया : विश्रांतीनंतर विराट कोहली करणार भारतीय संघात पुनरागमन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघ हा गेल्या महिन्यात ऑस्ट्रलिया दौऱ्यावर होता. त्या दौऱ्यामध्ये भारताने कमालीची कामगिरी करून सर्व मालिका आपल्या खिशात घातल्या. आत ऑस्ट्रेलिया संघ भारतात येणार आहे. भारतीय संघ मायदेशी ट्वेंटी-20 आणि वन डे मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या संघात भारताचा कर्णधार पुनरागमन करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्या नंतर कर्णधार विराट कोहली विश्रांतीवर होता. पण आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी विराट कोहली मैदानात उतरणार आहे.

भारताकडून पहिल्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी रोहित शर्मा , शिखर धवन , विराट कोहली, अंबाती रायडू , केदार जाधव , एम एस धोनी, हार्दिक पांड्या , जसप्रीत बुमरहा, मोहम्मद शमी , युजेन्द्र चहल , कुलदीप याधव , विजय शंकर , रीषभ पंत, सिद्धार्थ कौल , के एल राहुल या संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर उर्वरित तीन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात बदल करण्यात आला आहे. भुवनेश्वर कुमार हा तिसऱ्या एकदिवसीय मालिकेपासून खेळणार आहे.

टी २० मालिकेसाठी विराट कोहली , रोहित शर्मा , शिखर धवन , रिषभ पंत , दिनेश कार्तिक , हार्दिक पंड्या , कृणाल पंड्या , विजय शंकर , युजेन्द्र चहल, जसप्रीत बुमरहा, उमेश यादव , सिद्धार्थ कौल, मयंक मार्कंड  या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!