Share

मुंबई आणि पुण्यानंतर ‘ही’ दोन शहरं आहेत कोरोनाच्या निशाण्यावर

Published On: 

सोलापूर- राज्यात काल (मंगळवारी) 1802 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 57 हजार 851 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत असला तरीही सरकार बऱ्याच आघाड्यांवर अपयशी ठरताना दिसत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार पार, आज सकाळी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 96 ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 3028 इतकी आहे तर यापैकी 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यापैकी 165 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1207 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील पंढरपूर ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यू पुकारला आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात रुग्ण वाढत असल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं. आजपासून तीन दिवस पंढरपूर गाव राहणार बंद राहणार आहे. दुकानं उघडे ठेवणाऱ्यांना पाच हजार तर विना मास्क 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

तर तिकडे सोलापूर शहरात आज दिवसभरात 18 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असून तर चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत शहरातील 1672 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर 143 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानकारक बाब म्हणजे आज 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 872 जण कोरोनामुक्त उर्वरित 657 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

राज्यातील सरकारला कोरोना झालाय – आ.सदाभाऊ खोत

#corona : ‘या’ जिल्ह्यात झाली पहिल्या बळींची नोंद

कोरोनामुळे राष्ट्रवादी-शिवसेनेची मोठी हानी, दोन शिलेदार गमावले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!