चेन्नई : एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे होत असलेल्या या सामन्याचा रविवारी (७ फेब्रुवारी) तिसरा दिवस आहे. या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ५७८ धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते.
मात्र, त्यांनी सावध सुरुवात केल्यानंतर लगेलचच चौथ्या षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने रोहित शर्माला झेलबाद केले. रोहितचा झेल यष्टीरक्षक जोस बटलरने घेतला. त्यामुळे रोहितला ९ चेंडूत ६ धावा करुन माघारी परतावे लागले.
चौथ्या षटकात रोहित बाद झाल्यानंतर पुजारा आणि गिल चांगला खेळ करत होते. गिलने यावेळी काही शानदार फटकेही खेळले. मात्र, जोफ्रा आर्चरने चांगल्या लयीत असलेल्या गिलला झेलबाद केले. गिलचा झेल मिड-ऑनला जेम्स अँडरसनने उत्तमप्रकारे झेलला. त्यामुळे गिलला २८ चेंडूत २९ धावा केल्यानंतर विकेट गमवावी लागली. गिल बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. लंचनंतर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली परंतु सुरुवात खराब झाली. पुजारा रोहित सह विराट तंबूत.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

