Share

हेक्टरनंतर आता एमजी लाँच करणार ‘ही’ जबरदस्त कार !

Published On: 

मुंबई: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी वाहन खरेदी केली. अद्याप देखील ही विशेष वाहन खरेदी सुरूच आहे. यामध्ये ग्राहकांचा ऑफर आणि डीस्कउंट मध्ये वाहन खरेदी करण्याकडे कल असतो. तर आता अशीच संधी ग्राहकांना आणली आहे. कारण एमजी मोटार इंडिया कंपनीने आपली नवीन जबरदस्त कार लाँच करणार आहे.

२०१९ मध्ये एमजी मोटार इंडिया कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश केला आहे. तर आता कंपनी अजून एक कार लाँच करणार आहे एमजी मोटर इंडियाने सात सीटर गाडी लवकरच बाजारात आणत असल्याची माहिती दिली आहे. एमजीच्या मिड साइज एसयूव्हीला भारतात चांगली पसंदी मिळाली आहे. आता यामध्ये 7 सीटर व्हेरियंटचा पर्याय येणार असून अधिक चांगले फिचर्स असणार आहेत. कंपनीने नवीन CVT गियरबॉक्स आताच्या पेट्रोल इंजिनसोबत जोडले आहे. नवीन सीव्हीटी युनिट 2021 एमजी हेक्टरमध्ये 1.5-लीटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसोबत जोडले जाणार आहे. हे इंजिन 141Bhp आणि 250nm टार्क जनरेट करतं. या आधीच्या गाडीत एमजी हेक्टर पेट्रोल वेरियंट ड्युअल-क्लच ट्रान्समिशनसह (DCT) सादर करण्यात आलं होतं.

भारतात एमजी हेक्टर प्लस 6 सीटरची किंमत 13.73 लाख रुपये ते 18.68 लाख रुपयांपर्यंत आहे. सीव्हीटी युनिट 2021 एमजी हेक्टरची किंमत 50 ते 60 हजारांनी कमी करण्याची शक्यता आहे. तर एमजी हेक्टर प्लस 7 सीटरची किंमत 6 मॉडलच्या तुलनेत एक लाख रुपयांनी जास्त असल्याचा अंदाज आहे.

यामध्ये तीन इंजिन पर्याय असण्याची शक्यता आहे. ज्यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड सिस्टिमसोबत 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 143 बीचएपीची पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते. पेट्रोल इंजिन 6 स्पीड मॅन्यूअल आणि डीटीसी ऑटोमॅटीक ट्रान्समिशन सोबत आहे. तिसरे इंजिन 2.0 लीटर डिझेल इंजिन 168 बीचएपीची पॉवर आणि 350 टॉर्क जनरेट करते. 6 सीटर प्रमाणेच 7 सीटर गाडीचे फिचर्स असतील. 6 सीटर मध्ये कारच्या पुढच्या बाजूला असलेली ग्रिल, प्रीमीयम एलईडी आणि क्रोम असेल. आयस्मार्ट इन्फोटेन्मेंट सिस्टम असेल. स्मार्ट स्वाइफ फंक्शनसोबत पॉवर टेल गेट, 8 कलर एंबियट लायटिंग, एबीएस, ईएससी, 360 डिग्री कॅमेरा, पॅनारोमिक सनरुफ, हिल होल्ड असिस्ट असे अनेक फिचर्स देण्यात आलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!