मुंबई: कोरोनाने देशासह महाराष्ट्र राज्यातील कहर हा सुरूच ठेवला आहे. तर यामुळे, राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊन मध्ये जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना आटोक्यात आला आहे. यानंतर आता मुंबईतूनच आता खुशखबर येत आहे. देशात कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा चिंताजनक होता.
कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लक्ष्य निर्धारित करुन होत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने होत आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झाले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही आता 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, अशी दिलासादायक माहिती समोर आली आहे.
कोविड 19 संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक उपाययोजना करताना योग्य नियोजन, अंमलबजावणीची निश्चित दिशा आणि सातत्याने पाठपुरावा करुन प्रत्येक कार्यवाही केली जात आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रत्येक धोरण आखताना त्यामध्ये लक्ष्य निर्धारित कामगिरी करण्यावर प्रशासनाकडून सांघिक भर दिला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह समारंभात आता फक्त १० लोकांच्या मर्यादेपर्यंत परवानगी
सर्वात आधी प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड 19 संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता वस्तुस्थितीदर्शक आकडेच बोलू लागले आहेत.
एका बाजूला रुग्ण संख्या नियंत्रणात आणणे, त्यांना वेळीच शोधणे यावर जोर दिला जात असताना दुसऱया बाजूला प्रत्यक्ष रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. दिनांक 22 जून 2020 रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे 50 टक्के होते. दिनांक 1 जुलै 2020 रोजी हे प्रमाण 57 टक्के झाले. तर दिनांक 12 जुलै 2020 रोजी हा दर 70 टक्के झाला आहे, असे वृत्त आयबीएन लोकमत ने दिले आहे.
राजस्थानात संघर्ष : गेहलोत म्हणतात इतिहास भाजपला माफ करणार नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

