Share

अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता मलाईका अरोराची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Published On: 

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन कपूरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता त्याची कथित गर्लफ्रेंड मलाईका अरोरालासुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. ति काही दिवसांपासून एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. अर्जुन कपुरला कोरोना झाल्यानंतर मलायका अरोराने स्वतःची टेस्ट केली होती.

कोविड टेस्ट मध्ये ती पॉझिटिव्ह आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. बातमीनुसार मलायकाची बहीण आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. मलायका एसिम्प्टोमॅटिक आहे आणि सध्या घरगुती विलगीकरणामध्ये आहे. यापूर्वी 6 सप्टेंबरला बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरलाही कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

पंकजा मुंडे पुन्हा सक्रीय, घेणार मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट

सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबत माहिती देताना लिहिले. अर्जुन कपूर त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या शुटींंगमध्ये व्यस्त होता. अजून या चित्रपटाचे नाव निश्चित केले गेले नाही. मलायका एका डान्स रियालिटी शोसाठी शूटिंग करत होती. बॉलिवूडमधील कलाकारांना होत असलेल्या कोरोनाच्या लागणाबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मुंडेंची कोरोनावर मत

लवकरात लवकर मलाईकाने कोरोनावर मात करावी,अशी प्रार्थना तिचे चाहते समाजमाध्यमांवर करत आहेत. “चल छैय्या” “मुन्नी बदनाम हुई” अशा लोकप्रिय गाण्यांमध्ये मलाईकाने नृत्य केलेलं आहे. आजही तिची गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. मागे काही दिवसांपूर्वी मलाईका आणि अरबाज खान यांच वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले होते. त्यांनी आता घटस्फोट घेतला आहे. त्यांना एक मुलगाही आहे. घटस्फोटानंतर मलाईका नेहमी अभिनेता अर्जुन कपूरसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसली. त्यांच्या नात्यांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

मुहूर्त ठरला, राज्यसेवा परीक्षांच्या तारखा जाहीर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!