Share

तुळजापूरात संचारबंदी काळात नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देणार; गर्दी टाळण्याचे आवाहन !

Published On: 

तुळजापूर – कोरोना विषाणूच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे व पोनी हर्षवर्धन गवळी, मुख्याधिकारी अशिष लोहार यांनी जातीने लक्ष घालुन नागरिकांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिल्याने नागरिकांना संचार बंदी काळात दिलासा मिळत आहे.

किराणा दुकाने दवाखाने बँका भाजी मंडई दुध विक्री अत्यावश्यक मालवाहतुक सेवा अदि उघडे ठेवल्याने ऐकवीस दिवस माल मिळतो कि नाही या चिंतेने ञस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असुन परिस्थिती नियंञणात येवुन वातावरण सुरुळीत झाले आहे. आता ख-या अर्थानै रस्ते ओस पडत आहेत.

तुळजापूर शहर सह तालुक्यची शहरातील कायदा-सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या भागात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय पोलिस अधिकारी डाँ दिलीप टिपरसे नगराध्यक्ष सचिन रोचकरी मुख्याधिकारी अशिष लोकरे यांच्या समावैत वैद्यकीय अधिकारी डाँ प्रविण रोचकरी तसेच महावितरणचे सिंग अदि अधिकारी वर्गाने केली व नियोजन बध्द पध्दतीने सुरक्षा आरोग्य सुविधा विज पुरवठा दुध पुरवठा भाजीपाला देवाणघेवाणसाठी बँका किराणा दुकाने सह अन्य सुविधा ऐकवीस दिवसासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत.किराणा दुकाने,मेडीकल,दवाखाने बँका दिवसभर उघडे ठेवले आहेत आठवडा बाजार येथे भाजीमडई सुरु केली असुन सकाळी सहा ते राञी दहा पर्यत उघडी ठेवली जाणार आहे.

शहरातील नगरसेवक रणजित इंगळे व सुनिल रोचकरी यांनी घरपोच भाजीपाला व किराणा पोहचविण्यासाठी नियोजन करुन आपआपल्या प्रभागात मास्क वाटुन जनजागृती करीत सर्वञ स्ञी पुरुष पोलिस व नगरपरिषद कर्मचारी तैनात असुन महिला वर्ग न भिता खरेदी स येत आहे.
पोलिस घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आपण कुठे जात आहात? काही अत्यावश्यक काम आहे काय? अशी आस्थेने विचारपूस करीत करुन कामाशिवाय फिरु नका असे आवाहन करीत आहेत किराणा दुकान, भाजी बाजार, दुकानदार, फळ विक्रेते यांचेशी संवाद साधला व काही अडचणी असल्यास सांगा अशी विचारपूस करित आहेत.

‘लॉकडाऊन’च्या काळात किराणा, दूध, भाजी,फळे, औषधी अशा सर्व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा आणि अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याच्या संदर्भात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे. माफक दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशारा प्रशाषणाने दिला आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये. प्रशासनाचे काम उत्तम सुरू असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शासनपातळीवर योग्य प्रकारचे नियोजन करण्यात येत असून नागरिकांनी संयम बाळगावा आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांनी केले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!