Share

Aditya Thackeray | खोके कुणाकडे किती पोहोचले यावरून शिंदे गटातील आमदारांमध्ये भांडण; आदित्य ठाकरेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | मुंबई : जुलैमध्ये झालेल्या राजकीय नाटकानंतर राज्यात सत्तांतर झाली. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसतात. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या बंड मध्ये सहभागी असलेल्या आमदरांना खोके आमदार असं देखील संबोधित करण्यात आलं असून खोके सरकार, असा नारा देखील विरोधकांनी लावला होता. अशातच शिवसेना उद्धब बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षातील नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया-

आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा खोक्यावरून शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. खोके कोणाकडे किती पोहोचले यावरून दोन – तीन आमदारांमध्ये आता भांडण सुरू झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. चाळीस गद्दार गेले मात्र नवे सहकारी आमच्यासोबत येत आहेत. त्यामुळे समाधान वाटत असून, त्यांना घेऊन आम्ही पुढे जात असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

तसेच पुढे ठाकरे म्हणाले कि, हे सरकार अजून राजकारणातच अडकलं आहे, घटनाबाह्य सरकारने कामही करायची असतात, हे त्यांना अजून जाणवले नाही. राज्यात केवळ आश्वासनांवर आश्वासने आणि घोषणांवर घोषणा देणे सुरू आहे, जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही, त्यामुळे या सरकारला ‘घोषणा सरकार’, ‘खोके सरकार’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. आपण काम करणे गरजेचे आहे, हेही ते विसरून गेले आहेत, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!