🕒 1 min read
पुणे : वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. याचवेळी त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री यांच्यावर साधला निशाणाः
आपल्याकडे एक आरोग्यमंत्री आहेत, असं आदित्य ठाकरेंनी म्हणताच जनतेकडून खोके मंत्री उत्तर आलं. यावरुन खेकडा मंत्री असं तानाजी सावंत यांचा उल्लेख करण्यात आला. खेकडा मंत्री यांना हाफकिन हा दलाल आहे असं वाटलेलं, नशिब कोविड त्यांना खेकडा नाही वाटला नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
यादरम्यान, आदित्य ठाकरेंनी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं कौतुक केलं. तसेच जनतेने देखील त्यांचं काम पाहिलं असून फरक आता दिसून येतो, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, शिंदे सरकारच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोण माझ्या गटात येतो यासाठी प्रयत्न चालू आहेत. यानी केलेले चाळीस वार आम्ही पचवलेत. बारा खासदारांचे वार आम्ही पचवलेत. परंतु, आपल्या स्वार्थासाठी महाराष्ट्रातील तरूणांवर वार का करता? असा सवाल उपस्थित करत हे सरकार नाही तर सर्कस असल्याची टीका राज्य सरकारवर आदित्य ठाकरेंनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray | “खोके सरकारचं लक्ष त्यांच्या गटात कोण येतंय याकडे आहे, मात्र उद्योग…”, आदित्य ठाकरेंचा आक्रोश
- Monica O My Darling | राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांची डान्स फ्लोअरला धूम, मोनिका ओ माय डार्लिंगचा टीझर रिलीज
- Chandrashekhar Bawankule | “बारामती मतदार संघात घडी बंद करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले इरादे
- Viral Video | लग्नापूर्वी नववधू वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये पोहोचली, पहा व्हिडिओ
- Music Therapy Benefits : गाणी ऐका आणि निरोगी राहा! होय, संगीतामुळे राहू शकता तुम्ही तंदुरुस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
