Share

मोदींनी जाहीर केले पॅकेज केवळ ४ लाख कोटींचे, कपिल सिब्बलांचा खुलासा

Published On: 

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक पॅॅकेजवर टीका केली आहे. मोदींनी दिलेले पॅकेज केवळ ४ लाख कोटींचे असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हंटल आहे. मंगळवारी जनतेशी संवाद साधताना मोदी यांनी २० लाख करोड रुपयाच्या पॅॅकेजची घोषणा केली होती.

याच पॅकेजबाबत कपिल सिब्बल यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ८ लाख कोटी रुपये अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी देणार आहे. तर ५ लाख कोटींचे सरकार अतिरिक्त कर्ज घेणार असून एक लाक कोटी रुपये रिवॉल्व्हींग गँरंटी( ठेवी) मधून मिळणार आहेत पंतप्रधान मोदी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे बोलत आहेत. मात्र, कॅश आऊट फ्लो फक्त ४ लाख कोटींचा असणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे सिब्बल म्हणाले.

दरम्यान मोदी यांनी २० लाख करोड रुपयाच्या पॅॅकेजची घोषणा केल्यानंतर काहींनी याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात आता कपिल सिब्बल यांनी नवा खुलासा केला आहे. असे असले तरी आता कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केअर फंडमधून ३१०० कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पी एम केअर फंडातून स्थलांतरित मजुरांसाठी कोटींची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हेंटिलेटरच्या खरेदीसाठी २००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर १०० कोटींची तरतूद ही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी मदत म्हणून करण्यात आली आहे. केंद्र सरकार पीएम केअर फंडमधील २००० कोटी रुपयांत ५० हजार व्हेंटिलेटर खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे सर्व व्हेंटिलेटर भारतीय कंपन्यांनी तयार केलेले असणार आहेत. यामुळे कोरोनाच्या लढ्याला नक्कीच बळ येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

नाथाभाऊंंना पक्षाने बरेच काही दिले, त्यामुळेच आता वरिष्ठांनी संधी नाकारली असेल : चंद्रकांत पाटील

भाजपकडून पंकजा मुंडे यांचे पंख छाटले जातायत, खडसेंनी केला गंभीर आरोप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!