Share

कोरोनाबाधित व्यक्तीसोबत कोणताही भेदभाव करू नका – सोनाली कुलकर्णी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

तसेच याच पार्श्वभूमीवर कलाकार देखील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनी आणि कलाकारांनी एकत्र येऊन अनब्रँडेड व्हिडिओ बनवला आहे.

https://www.facebook.com/SonaliKulkarni.org/posts/2611015019144851

याचप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तींसोबत होत असलेला भेदभाव रोखण्याच्या हेतूने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. हा ७० सेकंदांचा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन कलाकारांनी चाहत्यांना केलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनाबाधित व्यक्तीसोबत कोणताही भेदभाव करू नये, अशी विनंती आणि आवाहन जनतेला केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!