मुंबई : झी युवावरील ‘फुलपाखरू’ या मालिकेतून पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ऋता दुर्गुळेने अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आपल्या सौंदर्यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज करणाऱ्या या अभिनेत्री आता पुन्हा एकदा नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ऋता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/CSI2EujIcrZ/?utm_medium=copy_link
नुकताच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तो पाहून प्रेक्षक आणि चाहत्यांच्या आनंदी झाले आहेत. ऋताला पुन्हा एकदा मालिकेमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. त्यानंतर आता या प्रोमोद्वारे ती पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाली आहे.
ऋताने या मालिकेचा टीझर आणि प्रोमो शेअर करत ‘कमिंग बॅक होम वाली फिलिंग’ असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या मालिकेचे नाव ‘मन उडू उडू झालं’ असंअसून ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.
फुलपाखरू मालिकेतून ऋताला तिच्या सौंदर्यामुळे तसेच तिच्या इनोसेंट अभिनयामुळे तिने तिचा एक वेगळा चाहता वर्ग मिळवला. ऋताचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. तिला लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. तिच्या फोटोंमुळे ऋता नेहमीच चर्चेत राहिले आहे. तिच्या फुलपाखरू या मालिकेने निरोप घेतला असला तरी देखील ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
महत्त्वाच्या बातम्या
- जेएनयूत तोडफोड केलेल्यांपैकी अद्याप एकालाही अटक नाही; सरकारची संसदेत माहिती
- नाणेफेक जिंकत इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात केवळ एक फिरकीपटू
- केजरीवाल पीडीतेच्या कुटुंबियांना भेटायला गेले अन् मंचावरून पडले
- दिवाळीपूर्वीच भारतात फटाके फुटणार! ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाक क्रिकेट रणसंग्राम
- पहिल्या कसोटीपुर्वी अँडरसनने दिला टीम इंडियाला इशारा, म्हणाला ‘हिशोब चुकता करणार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

