मुंबई: स्टार प्रवाह या मराठी वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून गैरवर्तवणुकीचे कारण देत अभिनेते किरण माने यांना काढण्यात आले. यामुळे राज्यात चित्रपटसृष्टी तसेच राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर समाज माध्यमावर आता किरण मानेंच्या हाती कोणतेही काम नसल्याचे अनेक प्रतिक्रिया उमटल्या. मात्र आजच किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांची नवीन ऐतिहासिक चित्रपटात वर्णी लागली असल्याची माहिती दिली आहे.
‘रावरंभा’ या चित्रपटातून ऐतिहासिक प्रेमकहाणी समोर येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार असून त्यात किरण माने यांचीही वर्णी लागली आहे.
https://www.facebook.com/photo.php?fbid=10224645335628394&set=a.3508579880783&type=3
किरण मानेंची फेसबुक पोस्ट-
आनंद वो…निव्वळ आनंद… नविन भन्नाट जबराट नादखुळा भुमिका ! सोबत प्रतिभावानांची टीम !! आपन वास्तवात ज्या विचारधारेची ‘भुमिका’ घेत असतो…लढत असतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असनारी ‘भुमिका’ मिळावी, यासारखं दूसरं समाधान नाय भावांनो !!!
“शुटिंग सुरू झाल्यापासून फेसबुकवर किरण माने, न्यूज चॅनलवर किरण माने, पेपरमध्ये किरण माने, सेटवर आलं की समोर किरण माने आणि कॅमेरा लेन्समध्ये पाहिलं तरी किरण माने…” अशी चेष्टा करत पोट धरून हसनारे आनि त्याचवेळी सतत पाठीवर हात ठेवून बळ देनारे मराठीतले दिग्गज कॅमेरामन संजय जाधव.. सोबत अपूर्वा नेभळेकर,ओम भूतकर, संतोष जुवेकर, कुशल बद्रिके.. टीव्हीवर माझ्यावर खोटे आरोप होत असताना, “आम्हाला माहीतीये ओ सर तुम्ही खूप चांगले आहात.कुणी काहीही म्हणू दे.” असं बोलुन मला दिलासा देणारी माझी गांववाली मोनालीसा बागल… आर्ट डिरेक्टर वासू पाटील.. माझ्या मातीतला, अतिशय भला ‘माणूस’ असलेला दिग्दर्शक अनुप जगदाळे… प्रचंड मोठ्ठा तामझाम असलेला भव्यदिव्य सिनेमा निर्माण करत असताना खर्चाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करनारे निर्माते शशिकांत पवार… प्रताप गंगावणेंसारखा सिद्धहस्त लेखक.. आनखी काय पायजे?
…एक लै भारी किस्सा घडला परवा.. स्पाॅटबाॅय धावत-धावत व्हॅनिटीमध्ये आला… चेहर्यावर संताप दिसत होता.. “सर, फेसबुकवर एकानं तुमची टवाळी करत लिहीलंय.. ‘आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.’ त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय ‘आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय..’ तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??” मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची…..बाजूला मी न्यायासाठी लढा देत असतानाच, दुसर्या बाजूला अशा व्यक्तीची भुमिका करत होतो ज्यानं परक्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हनून स्वत:चा जीव दिला. मुहूर्त होऊन माझं पहिलं शेड्यूल नुकतंच संपलं… प्रतिक्षा पुढच्या शेड्यूलची.. तोपर्यन्त न्यायाची दूसरी लढाई सुरू..
या आठवड्यात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या, त्यातलीच ही एक… धन्यवाद अनुप..खूप खूप मनापासून आभार !!! अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- आम्हाला घरात बसायला लावणारे पंतप्रधान लॉकडाऊनमध्ये पार्टी करतात; चिमुरडीची तक्रार
- “शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी निती आमच्याच…”, योगेश कदमांचा गंभीर आरोप
- सोमवारपासून शाळा उघडणार? आज मंत्रीमंडळात निर्णयाची शक्यता
- “वैचारिक मतभेद असले तरी…”; राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांनी केले मनसेच्या उमेदवाराचे अभिनंदन
- रजनीकांतला वाचवायचे होते ऐश्वर्या-धनुषचे नाते, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

