सेलू : सेलू शहरातील फुलेनगर परिसरातील एका राहात्या घरात १८ जण एकत्र जमुन नमाज पठन करीत असताना शुक्रवारी १७ एप्रिल रोजी दुपारी कार्यवाही करण्यात आली.
शहरातील फुले नगर भागातील रहिवासी असलेल्या खाजा खाँ साहेब खाँ पठाण यांच्या घरात १८ जण एकत्र जमून नमाज पठन करत असल्याचे या भागात गस्ती घालताना उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या निदर्शनास आले.
कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लाॅकडाउन,संचारबंदी लागू असल्याने अनाधिकृत एकत्र जमून नमाज पठन करीत असलेल्यांनी नियमाचे उल्लंघन केले असुन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांना सदरील प्रकणात पुढील कारवाई च्या दिल्या घटनास्थळी उमाकांत पारधी तहसीलदार बालाजी शेवाळे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर तलाठी मुकुंदा आष्टीकर यांची उपस्थिती होती.नायबतहसिलदार प्रशांत थारकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सेलू पोलिस ठाण्यात सदरील अठरा व्यक्तीचे विरोधात भादवि १८८,२६९,राष्ट्रीय अप्पती व्यवस्थापन कायदा२००५,कलम ५१ ब महाराष्ट्र पोलीस कायदा ३७/३,१३५,साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम१८९७कलम२,३,४,महाराष्ट्र कोव्हीड१९उपाय योजना अधिनियम२०२०चे नियम११अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व१८व्यक्तीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चप्पल जोड वरुन लक्षात आला प्रकार
उपजिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांची नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी तेथेच पाच पथक तयार करून संचार बंदीचे उल्लंघन थांबवण्यासाठी शहरात विविध भागात गस्त घालतांना फुलेनगर परिसरात हा प्रकार आढळून आला. घरात प्रवेश करून पाहिले असता प्रकार उघडकीस आला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

