Share

पालघर प्रकरणातील आरोपी हे भाजपचे पदाधिकारी : कॉंग्रेस

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील पालघरच्या गंडचिंचले गावात अफवेवरुन तीन जणांना जी गमवावा लागल्याची  धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी हे भाजपचेच पदाधिकारी असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करत या साधूंचे मारेकरी भाजपचे पदाधिकारी असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांनी यासंबंधित काही पुरावे सादर केले आहेत. साधुंच्या लिंचिंगचे आरोपी क्र. ६१  ईश्वर निकुले आणि ६५ भाऊ साठे हे भाजपचे पदाधिकारी आहेत, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच आरोपींच्या यादीत आणखी बरेच भाजप कार्यकर्ते आहेत. अटक झालेल्यांच्या यादीत भाजपच्या बूथ प्रमुखांचीही नावे असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. याबरोबरच त्यांनी काही छायाचित्रही समोर आणले आहेत.

दरम्यान, साधूंच्या हत्येत सहभागी असलेल्या त्यांच्या पक्षाच्या सदस्यांवर भाजपकडून कारवाई का केली जात नाही?, असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

हेही पहा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!