Share

‘राष्ट्रवादीच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या वादात शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. ZEE २४ तास या  वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

सुभाष देसाई म्हणाले,आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत व्हावे, यासाठी दोन वेळा कॅबिनेट बैठकीमध्ये प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याकडे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्लक्ष केलं, तसेच BKC येथील जागा बुलेट ट्रेन ला न देता त्यासाठी दुसरी जागा देता येऊ शकते असही आपण सुचवलं होतं . असा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे.

तसेच आपण याबाबतचे कागदपत्र सादर करू शकतो आणि माझी भूमिका स्पष्ट आहे, आम्हाच्या पक्षाची भूमिका खणखणीत आहे, बोटचेपी नाही आणि आम्हाला दिल्लीचे वटारलेले डोळे बघायची सवय नाही असही टोला भाजपच्या नेत्यांना लगावला आहे.

विनोद तावडे यांचा देसाई यांच्यावर खोटं बोलण्याचा आरोप –

आता भाजपचे नेतेआणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी सुभाष देसाई यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीला बोलाताने हे उत्तर दिलं असून याबाबतचे वृत्त लोकसत्ताने दिलं आहे. तावडे म्हणाले,

‘मंत्रिमंडळ बैठकीत सुभाष देसाई यांनी एकदाही विषय काढला नाही. हे खात्रीनं सांगू शकतो. याउलट अजेंड्यावर नसलेला एखादा विषय शिवसेनेच्या मंत्र्यानं बैठकीत काढला की, लगेच ते लगेच पत्रकार परिषद घेऊन बातम्या छापून आणायचे. मंत्रिमंडळ बैठकीत जर उद्योग खात्याचा विषय असेल, तर सुभाष देसाई हे लक्ष द्यायचे. इतर विषय असल्यावर त्यांचं लक्षही नसायचं.’

‘असं असताना करोनाच्या परिस्थितीत राज्य सरकार काही करू शकत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचा विषय चालवत आहेत. त्यांच्या नादाला लागून सुभाष देसाई यांच्यासारखा सज्जन माणूस खोटं बोलायला लागला आहे. हे अतिशय वाईट आहे. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असेल, तर पुरावे द्यावे. नुसतं हवेत कशाला बोलायचं. त्यामुळे मला वाटतं देसाई यांचं हे वागणं बरं नव्हं,” असं तावडे यांनी म्हटलं आहे.’

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!