Share

अबब! आजोबांनी ‘या’साठी केला तीन हजार किलोमीटरचा प्रवास

Published On: 

बीड : रोजच्या आयुष्यातील कटकटीपासून काही काळ शांती मिळावी, नर्मदा परिक्रमा केल्याने लााभणारे आत्मिक समाधान, या गोष्टींमुळे एका आजोबांनी चक्क तीन हजार किलोमीटर पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. शहरालगत असलेल्या भाटवडगाव येथील मधुकर कुलथे यांनी ही किमया केली आहे.

जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीचा नायनाट व्हावा, या महामारीपासून संपूर्ण जगाचा बचाव व्हावा, तसेच विश्वाचे कल्याण व्हावे, सर्वत्र शांतता नांदावी या उद्देशाने पाच राज्यांतून ही परिक्रमा कुलथे यांनी केली आहे. धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असलेले मधुकर कुलथे यांनी महावितरण कंपनीमध्ये सेवा करण्याबरोबरच किर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांत नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.

कुलथे यांनी तब्बल शंभर दिवस पायी भ्रमंती करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. नर्मदा परिक्रमेमुळे नित्य पायी फिरणे होते, गोदावरी, नदीवर स्नान करणे मुक्त श्वास घेणे, वेगवेगळ्या तिर्थक्षेत्राचे दर्शन, अखंड नामस्मरणात राहणे हे परिक्रमेत सुरू असते. इतक्या कालावधीत वाद – विवाद, निंदा, स्तुती, चिंता यापासून दुर राहिल्याने स्वभावात बदल घडतो. निसर्ग सहवासात अत्यल्प गरजात साधे जीवन अनुभवास मिळते असेही कुलथे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!