Share

‘परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयलच’, नवाब मलिक यांनी दिली माहिती

Published On: 

मुंबई: परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी आंचल गोयल असतील अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिकयांनी दिली आहे. रुजू होण्याच आधीच गोयल यांची बदली अचानक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे परभणीत काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदमध्ये नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

दरम्यान परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ३१ जुलैरोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आयएएस अधिकारी आंचल गोयल या जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार होत्या. मात्र रुजू होण्याच आधीच गोयल यांची बदली अचानक रद्द करण्यात आली.अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर यांच्याकडे पदभार देण्यात यावा, अशा आदेशाचे पत्र शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना मंत्रालयातून आले. त्यानंतर काटकर यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला.

दरम्यान आंचल गोयल यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारावा म्हणून परभणीच्या जागरुक नागरिक आघाडीने आंदोलनदेखील केले होते. आता मंत्री नवाब मलिक यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण देत परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी आंचल गोयल असतील अशी माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!