Share

पाच विमानतळांवर तिकिट आरक्षणाबरोबरच `कॅब’ आरक्षणाची सुविधा

Published On: 

नवी दिल्ली : विमान प्रवासासाठी तिकिट आरक्षित करतानाच विमानतळावर असलेल्या `किऑस्क’ च्या माध्यमातून `ओला’, `उबर’ या टॅक्सी सेवाही आरक्षित करता येणार आहेत. या संदर्भात `भारतीय विमानतळ प्राधिकरण`ने `ओला’, `उबर’ यांसारख्या `कॅब’ कंपन्यांबरोबर करार केला आहे.

पुणे (महाराष्ट्र), चेन्नई, कोलकाता, लखनौ व भुवनेश्वर या विमानतळांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून नेहमीच प्रवाशांच्या सुविधा केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. विमानतळांवर प्रवाशांना शक्य तेवढ्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.

`ओला’ व `उबर’ यांसारख्या कॅब कंपन्यांबरोबर करार करून प्रवाशांना कमीतकमी त्रास व चांगल्या सेवा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष गुरुप्रसाद महापात्रा यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!