Share

अवघ्या सहा महिन्याच्या बाळाने केली कोरोनावर मात ; मातेच्या दुधाने बजावली महत्वाची भूमिका!

Published On: 

रत्नागिरी : गेले दोन महिन्यांपासून चीन मधल्या वुहान मधून प्रसारित झालेल्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यामुळेच महाराष्ट्रासह देशभर लॉकडाऊन आहे. या रोगाचा धोका हा बालकांना व वयोवृध्दांना जास्त असल्याचे सांगितले जाते. अशातच काही दिवसांपूर्वी नुकत्याच बाळंत झालेल्या महिलेला कोरोना लागण झाल्याने नवजात बालकाला खबरदारी म्हणून वेगळे निरीक्षणाखाली ठेवले होते.

तर, रत्नागिरी जिल्ह्यातील एका सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येताच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. १४ एप्रिल रोजी साखरतर या गावातील सहा महिन्याच्या बाळाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. दरम्यान बाळाला जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. त्याकरता वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला. यामध्ये आई आणि बाळाला ठेवण्यात आले. विशेष बाब म्हणजे बाळाच्या आईला मात्र कोरोनाची लागण झालेली नव्हती. बाळावरच्या उपचारा दरम्यान डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. बाळाची आई देखील बाळासोबत त्याच वॉर्डमध्ये होती आणि बाळाला स्तनपान करत होती. सरकारनं दिलेल्या गाईडलाईननुसार हे उपचार सुरू होते. बाळाला दूध देताना आईदेखील काळजी घेत होती. त्याचे परिणाम देखील सकारात्मक दिसून आले आहेत. कारण, दहा दिवसांनंतर बाळाचा कोरोनाचा दुसरा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. यामध्ये कोरोनाला हरवण्यासाठी आईच्या दूधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ABP माझाच्या वृत्तानुसार समजते.

औषध उपचारादरम्यान आईच्या दूधाने बाळाला कोरोनाच्या लढाईत खरी ताकद दिली, असं मत जिल्हा रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ आणि बाळावर उपचार करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. दिलीप मोरे यांनी व्यक्त केले आहे. कारण उपचार सुरू असताना देखील बाळाला स्तनपान सुरूच होते. त्याचा देखील सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं डॉ. मोरे यांनी सांगितले.

तसेच, पुढील ४ ते ६ दिवस बाळाचे आणखी काही रिपोर्ट घेतले जातील व त्यानुसार डिस्चार्ज देण्याचे निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!