जालना : आज ३ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुरग्रस्तांच्या मदतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये इतक्या तरतुदीस मान्यता दिली. तसेच जालना येथे ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे मराठवाडा व विदर्भातील रुग्णांसाठी उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे.
राज्यात पुणे, ठाणे, नागपूर व रत्नागिरी या चार ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये आहेत. जालना शहर मराठवाडा व विदर्भासाठी मध्यवर्ती असे आहे. या भागातील रुग्णांना उपचारांकरिता पुणे, नागपूर येथे जावे लागते. जालना जिल्ह्यात प्रादेशिक मनोरुग्णालय व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यानुसार जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
राज्यात पुणे,ठाणे,नागपूर व रत्नागिरी या 4 ठिकाणी प्रादेशिक मनोरुग्णालये कार्यरत असून सद्दस्थितीत मराठवाडा विभागासाठी एकही प्रादेशिक मनोरुग्णालय नाही.
1/3 pic.twitter.com/eVm5jOP8Tr— Rajesh Tope (@rajeshtope11) August 3, 2021
यामुळे रुग्णांसाठी आंतररुग्ण उपचार तसेच पुनर्वसन सुविधा उपलब्ध होणार आहे. मनोरुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, यंत्रसामुग्री, रुग्णवाहिका, औषधे, उपकरणे व मनुष्यबळ यासाठी १०४ कोटी ४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
निजाम राजवटीत जालन्यात मनोरुग्णालय
निजाम राजवटीत जालन्यात मनोरुग्णालय होते. ते काळाच्या ओघात बंद पडले. त्यामुळे गंभीर, आक्रमक व बेवारस सोडून दिलेल्या मनोरुग्णांच्या उपचाराचा प्रश्न गंभीर बनला होता. सध्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आठशे ते हजार मनोरुग्णांना भरती करून उपचार करण्याची गरज पडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील तोकड्या सुविधांशिवाय कोणताही पर्याय मराठवाड्यात नव्हता. त्यामुळे मनोरुग्णांना न्यायालयाने दाखल करण्याचे आदेश दिल्यावर पुण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय खासगीतील उपचार परवडणारे नसल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात मी बोलणारच!’
- ‘चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली’, मेहबूब शेख यांची पोलिसांत तक्रार
- ‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध
- मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

