Share

भारतीय सिनेमास विश्वस्तरवर नेणारं व्यक्तिमत्व ; निर्माता स्व.महेबूब खान जयंतीनिमित्त एक आठवण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महेबूब खान भारतीय सिनेमाचे एक असे निर्माता, दिग्दर्शक होते, ज्यांनी जवळपास तीन दशकांपर्यंत हिंदी सिनेमातील एकसे एक चित्रपट निर्मिती केली. त्याकाळात चित्रपटाची निर्मिती कमी प्रमाणात होत असे. तरीदेखील त्यांनी ऑस्कर चित्रपटाच्या रेसमध्ये हिंदी सिनेमा झळकवला होता.

‘मुद्देई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर-ए-खुदा होता है’ या टॅगलाईनने चित्रपटाचे शिर्षक पडद्यावर यायचे. यामुळे प्रेक्षकांच्या टाळयांनी प्रतिसाद मिळत असे. निर्माता स्व.महेबूब खान यांनी स्त्री प्रधाण भक्कम अशी निर्मिती असल्याचं बोललं जातं. चित्रपटात महिलांच्या भूमिका नेहमी आदरयुक्त असायचे. सुरूवातीस त्यांनी ‘अलीबाबा और चालीस चोर’ या चित्रपटातून अभिनय केला होता.  ३०वर्षाच्या कार्यकाळात सुमारे २४ चित्रपटांची निर्मिती केली होती.

त्यांनी १९३१ मध्ये चित्रपट निर्मितीकडे वळाले. ‘जजमेंट ऑफ अल्लाह’ हा त्यांचा पहिला निर्देशित चित्रपट होता. त्यानंतर एक से एक सिनेमांची निर्मिती केली. त्यांचा ‘मदर इंडिया’ हा चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट होते. यामाध्यमाने हॉलीवूडच्या टक्कर देण्यात आला.  हा चित्रपट सर्वांच्या आवडीस पात्र ठरला होता. यामुळे भारतीय सिनेमा विश्वस्तरावर नेण्याचं श्रेय त्यांना मिळाले. तर ‘सन ऑफ इंडिया’ त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला. त्यानंतर १९६४ मध्ये आरोग्य खराब झाल्याने त्यांचे निधन झाले. २००७ मध्ये महेबूब स्टुडियोतर्फे पोस्टाचं तिकिट काढण्यात आला. आज दिवंगत महेबूब खान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणी चित्रपटाच्या माध्यमाने रसिकांच्या मनात आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!