औरंंगाबाद : आईसमोर शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन कुख्यात गुन्हेगार शेख अरबाज ऊर्फ विशाल उर्फ भुऱ्या शेख अहेमद (वय २३,रा.कैलासनगर) याने मंगेश दिनकर माळोदे (वय २८,रा.संजयनगर,बायजीपुरा) या मित्राची हत्या केली होती. जिन्सी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेख अरबाज उर्फ विशाल याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले आहेत.
मंगेश आणि विशाल उर्फ अरबाज हे दोघे मित्र असून दोघेही सोबत नशा करीत होते. मंगेश मजुरी करून त्याचा उदरनिर्वाह करायचा. काही दिवसांपूर्वी दोघात वाद झाला होता. परंतु नंतर माफी मागून तो मिटला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी मंगेशने विशाल उर्फ अरबाजला कोणत्यातरी कारणाने त्याच्या आईसमोर शिवीगाळ केली. त्याच्याच राग विशाल उर्फ अरबाजने मनात धरला. त्यानंतर त्याने गुरुवारी रात्री मंगेशला संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ फोन करून बोलवून घेतले.
त्यानंतर दोघात पुन्हा वाद झाला, विशाल उर्फ अरबाज याने स्वतःजवळ असलेला चाकू काढत, मंगेशवर सपासप वार केले होते. त्यानंतर मंगेश तिथेच कोसळला होता. विशाल उर्फ अरबाज घटनास्थळावरून निघून गेला. घडलेला प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना बोलावले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत तपासला सुरुवात केली आणि विशाल उर्फ अरबाज उर्फ भुऱ्याला अटक केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने आ.सुरेश धसांनी विरोधी महिला उमेदवाराचे हॉटेल पाडले
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
- ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी’, मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्तांना विश्वास
- चिपळूणच्या नुकसानग्रस्त नागरिकांचा मुख्यमंत्र्यांसमोरच संताप, पाहा व्हिडिओ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

