🕒 1 min read
नवी दिल्ली : एखादी व्यक्ती हिंदू असेल तर ती आपोआप देशभक्तच असते, कारण ही बाब त्याचे चरीत्र आणि स्वभाव असते असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. महात्मा गांधी यांनी म्हटले होते की त्यांची देशभक्ती ही त्यांच्या धर्मातून निर्माण झाली आहे. त्यांच्या याच विधानाचा आधार घेत सरसंघचालकांनी हे विधान केले आहे.
जे.के.बजाज आणि एम.डी.श्रीनिवास यांनी लिहिलेल्या ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पॅट्रीअट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने सरसंघचालकांनी हे उद्गार काढले आहेत.स्वधर्म आणि देशभक्तीचा उल्लेख करत सरसंघचालक पुढे म्हणाले, "हिंदू आहे म्हणजे तो देशभक्त असणार. तो निद्रीस्त असू शकतो, त्याला जागं करायला हवं पण कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही असं देखील ते म्हणाले.
महात्मा गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये मांडलेल्या विचारांचा वेध घेताना, धर्म आणि देशभक्ती यांच्या परस्पर संबंधांवर भाष्य केले आहे. महात्मा गांधी हे हिंदू देशभक्त होते, अशी मांडणी करताना गांधीजींचे विचार, लिखाण, भाषणे आदींचे साह्य़ घेतले गेले आहे. ‘हिंदू हा देशभक्त असतोच. देशभक्त असणे हे हिंदूंच्या नसानसात भिनलेले असते. हिंदू भारतद्रोही असू शकत नाही’, अशी ‘हिंदू देशभक्त’ या शब्दाची भागवत यांनी उकल केली.
वेगळे असल्याचा अर्थ असा नाही, की आपण एका समाजाचे अथवा एक धरतीचे पुत्र बनून राहू शकत नाही. एवढेच नाही, तर पुस्तकाचे नाव आणि माझ्या हस्ते त्याचे विमोचन, याचा असाही अर्थ काढला जाऊ शकतो, की हा गांधीजींना आपल्या सोयीनुसार परिभाषित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महापुरुषांना कुणीही आपल्या सोयीनुसार परिभाषित करू शकत नाही. हे पुस्तक व्यापक संशोधनावर आधारलेले आहे आणि ज्यांचे मत यापेक्षा वेगळे असेल, तेदेखील संशोधन करून लिहू शकतात, असेही भागवत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सर्वांनी एकत्रित येऊन लोककल्याणाची कामे करायची असतात : देवेंद्र फडणवीस
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- सभागृहात पवार-फडणवीस एकाच मंचावर, तर बाहेर दोन्ही पक्षांच्या समर्थकांची हुल्लडबाजी
- थोड्याच वेळात कोरोना लसीकरण रंगीत तालमीला सुरुवात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
