Share

विनामास्क फिरणार्‍यांकडून 7 हजार 400 रुपयांचा दंड वसूल

Published On: 

🕒 1 min read

परभणी : जिंतूर रस्त्यावरील विसावा फाटा येथे विना मास्क फिरणाऱ्या 37 जणांवर महापालिकेच्या पथकाने मंगळवारी कारवाई केली. त्यांच्याकडून 7 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला.कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी विना मास्क फिरणारांविरूध्द कारवाईचे आदेश दिले आहेत.

महापालिका आयुक्त देविदासराव पवार यांनी अशा व्यक्तींविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकातील सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, राजू झोडपे, भारत देशमुख, हत्तीअंबिरे, आनंद राजुगे, रमेश भराडे आदींनी विसावा फाटा येथून विना मास्क फिरणाऱ्या तसेच ये – जा करणाऱ्या वाहनधारकांसह नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ७ हजार 200 रुपयांचा दंड पथकाने वसूल केला. या मोहीमेस नानलपेठ पोलिस ठाण्याचे फौजदार मारोती चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

महानगर पालिका तसेच जिल्हा प्रशासानाकडून कोरोना ससर्ग रोखण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरु आहेत, तरीही नागरिक विना मास्क फिरतांना दिसून येत आहेत. तर प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे, त्यामुळे विना मास्क फिरु नये, तसेच सॅनेटायझर वापरावे, गर्दीमध्ये फिरु नये, तसेच काही त्रास जाणवल्यास जवळील आरोग्यकेंद्राशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!