Share

दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे तथा त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर दिशा सालियन बदनामी प्रकरणी (Disha Salian defamation case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Charges filed against Narayan Rane and Nitesh Rane) सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली तसेच ती गरोदरही होती, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेत आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन केलं होतं. तसेच या प्रकरणी सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडेही दाद मागितली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

दरम्यान पोलिसांनी महिला आयोगाला याप्रकरणी रिपोर्ट दिला आहे, त्यात तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी दिशाने घराच्या बाल्कनीतून उडी मारत स्वतःचे आयुष्य संपवले होते. यानंतर दिशाच्या आत्महत्येची चौकशी सुरु होऊन दिशा आणि सुशांतच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? याबाबत चौकशी केली जात होती. त्यात दिशावर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली, असा संशयही काही जणांनी व्यक्त केला होता. त्यातच नारायण राणे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली होती.

नारायण राणेंचे ‘ते’ ट्वीट-

खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली. त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार?

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!