Share

प्राजक्ता माळी लवकरच चाहत्यांसाठी घेऊन येणारं एक सुंदर भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय  असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कमेंट करत असतात. यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास भेट घेऊन येणार आहे.

https://www.instagram.com/p/CRS6IniDyf1/?utm_source=ig_embed&ig_rid=104f2fb1-ab4e-4a8d-a115-7ec8b3a6086d

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट खुपचं खास आहे. यामध्ये प्राजक्ताने एका डायरीचा फोटो शेअर केला आहे. तसेच त्यावर लिहिलं आहे, ‘प्राजक्ताकडून लवकरच एक सुंदर भेट’. तसेच प्राजक्ताने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट. माझी गूपीतं म्हणा हवं तर…लवकरच…खास तूमच्यासाठी. यावरून असे लक्षात येत की प्राजक्ता लवकरच आपलं काहीतरी खास लिखाण आपल्यासाठी घेऊन येणार आहे. प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहतेहीउत्सुक झाले आहेत.

सध्या प्राजक्ता माळी सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करते. प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!