Share

वांद्रे गर्दी प्रकरणात दोषी असलेल्या विनय दुबेंना न्यायालयाकडून जामीन मंजूर

Published On: 

मुंबई : वांद्रे गर्दी प्रकरणात आरोपी असणारे उत्तर भारतीय महापंचायत अध्यक्ष विनय दुबे यांना आज न्यायालयातून जामीन  मिळाला आहे.  वांद्रे कोर्टाने १५ हजाराच्या जातमुचलक्यावर विनय दुबेला जामीन मंजूर दिला आहे. वांद्रे  येथे काही दिवसांपूर्वी परप्रांतीय नागरिकांनी चांगलीचं गर्दी केली होती.

आम्हाला घरी जायचं आहे आमच्यासाठी विशेष ट्रेन सोडा, अशी मागणी या सगळ्या जमावाने केली होती. या प्रकरणी लोकांना व्हिडीओद्वारे जमण्याचे आवाहन करणाऱ्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. मात्र त्याला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.

१४ एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे स्टेशन बाहेर ३ ते ४ हजार परप्रांतीयांचा जमाव जमा झाला होता. या जमावाला वांद्रे स्टेशनबाहेर जमवण्यासाठी कारणीभूत होता तो विनय दुबे कारण त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विनय दुबे याचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क असून तो उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. १४ एप्रिलचा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला. तरीही १४ एप्रिल रोजी वांद्रे स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउन असल्याने ट्रेन, बससह इतर सगळ्या वाहतुकीच्या सेवा बंद आहेत. त्यामुळे हातावरचं पोट असलेले अनेक कामगार मुंबईतच अडकले. हेच कामगार मुंबईतील वांद्रे स्टेशनवर १४ एप्रिल रोजी जमा झाले होते. या सगळ्या गर्दीला कारणीभूत ठरलेल्या विनय दुबेला अटक करण्यात आली होती. आता आज त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!