मुंबई : राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईचा अन्नदाता म्हणून ओळख असलेल्या डबेवाल्यांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. या मुंबईच्या अन्नदात्याची पोटाची खळगी भरण्यासाठी ‘डबेवाला कुरियर सर्विसेस स्टार्ट अपची’ स्थापना करणाऱ्या 15 वर्षीय तरुण उद्योजक तिलक मेहताने पुढाकार घेतला आहे. आज मुंबईत अशा हजारो डबेवाल्यांना महिन्याभराचे रेशनचे वाटप तो त्याच्या कंपनीमार्फत करणार आहे.
दरम्यान,मुंबईत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी झोपडपट्टी भागात इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनवर भर देण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिले आहेत. मुंबईत झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत असल्याने आरोग्यमंत्र्यांनी ही सूचना दिली आहे.
याआधी झोपडपट्टी भागात एखादा रुग्ण आढळल्यास त्याच्या आसपासच्या संपर्कात आलेल्या लोकांना घरीच क्वॉरन्टाईन करण्याच्या सूचना महापालिका देत होती. मात्र त्यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त होती. तसेच लहान घरात लोकांना इतरांपासून लांब राहणं देखील कठीण होतं. त्यामुळे आता अशा लोकांना त्या भागातून बाहेर आणून इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईनवर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. १४ रोजी लॉकडाउनचा पहिला टप्पा संपल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला. त्याचबरोबर २० एप्रिलनंतर काही बाबतीत शिथिलता देण्यात आली आहे. दुसरी ३ मे तारीक जवळ येत असून, पुढील दिशा ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (२७ एप्रिल) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. करोनाच्या संकटाबरोबर लढतानाच थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
