Share

कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून वेगवान घडामोडी घडत असताना राजधानी दिल्लीतही अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अशातच देशाच्या राजकारणात काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळख असलेले अहमद पटेल अचानक भाजप नेते नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी अनेक दिग्गज नेते दररोज एकमेकांची भेट घेत असताना भाजप आणि काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र अहमद पटेल यांनी या भेटीबाबात स्पष्टीकरण देताना महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर कुठलीही चर्चा झाली नाही. देशात अपघात होत आहे, यावर माहिती देण्यासाठी आलो होतो, असं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले अहमद पटेल हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींवर या दोघांमध्ये चर्चा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नितीन गडकरी यांना मध्यस्थी करण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (ता. ६) पुन्हा एकदा दिल्लीला जाऊन गडकरी आणि अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. महायुतीतून असलेल्या ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढविली आता तेच आता मुख्यमंत्रिपदासाठी हट्ट करत अडून बसले आहेत. त्यामुळे निवडणुकांचे निकाल लागूनही सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1191961846586195968?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191966552884727809?s=20

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!