Share

दिवाळी स्पेशल – आज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : दिवाळीचा महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. माणूस दिवसभर कष्ट करून घाम गाळून पैसे कमावतो. त्या मिळवलेल्या पैशातून घरात समृद्धी यावी याकरता धनत्रयोदशीला फार महत्व आहे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हिंदू कालदर्शिकेनुसार आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं.

यंदा धनत्रयोदशी आणि वसूबारस देखील आहे. भारतीय संस्कृतीत पशूधनाची देखील पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी गोधनाची आणि प्राण्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. गायीच्या पूजनाने सर्व देवतांपाशी आपली सेवा पोहचत असल्याचे मानले जाते. या दिवशी गायीला नैवेद्य दाखवले जाते.

या नवीन नवीन धान्याची पूजा करण्याचा दिवस ती धनत्रयोदशी. शहरात आपण या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं यांची पूजा करतो. नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे.

शहरात गुजराती-मारवाडय़ाच्या सहवासाने या दिवसाला सर्रास ‘धनतेरस’ असं म्हणू लागलेत अलीकडे.!! आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्यजन या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187602811187384320?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187602117902520321?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!