🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सर्वच ठिकाणाचे उमेदवार जाहीर झाले असून त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यावेळी भाजपने जेष्ठ नेत्यांच्या उमेदवारीला कात्री लावली आहे. यात एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.
या सर्वांच्या उमेदवारीवरून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. याविषयी बोलताना गिरीश महाजन यांनी ‘भाजपने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात एकनाथ खडसे, मंत्री विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नाशिकचे बाळासाहेब सानप मागे होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली नाही असं विधान केले आहे. ते बंडखोरी रोखण्यासाठी नाशिकमध्ये आले होते.
एकनाथ खडसेंच्या मुलीला उमेदवारी दिल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. राज्यात बंडखोरी झाली असली तरी अर्ज माघारीपर्यंत सर्व ठीक होईल असं महाजन म्हणाले. तसेच बंडखोरांना माफी नाही. पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराही बंडखोरांना दिला आहे. त्यामुळे ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना भाजपकडून कडक शिक्षा होण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये सर्वेक्षणातून उमेदवारी दिली जाते. पैसे देऊन नाही असं म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. दरम्यान, भाजपने या मंत्र्यांची उमेदवारी कापल्यामुळे त्याचा परिणाम नेमका काय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1180425006062297088?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180424635017359360?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180419458017325057?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
